Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra

What is The Annapurna Scheme In Maharashtra ? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे ?

Facebook
WhatsApp
Telegram

           मित्रांनो,महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेली Mukhyamantri Annapuran Yojana काय आहे,याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.आपल्या देशातील महिलांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे,देशातील गरीब कुटुंबांना घरघुती जेवण बनविण्यासाठी स्वच्छ इंधन मिळावे,त्याचप्रमाणे गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी,स्त्री सक्षमीकरण प्रभावीपणे व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वर्ष 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती.आणि या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी तेल कंपन्याच्या माध्यमातून देण्यात आली व त्याच्या मदतीने गॅस जोडणी सद्या देखील सुरु आहे.महाराष्ट्रात सद्याच्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ज्यांची ज्यांची गॅस जोडणी आहे.या व्यतिरिक्त गरीब कुटुंबातील  गॅस जोडणी असलेले काही लाभार्थी जे,बाजार दराने  गॅस पुनर्भरण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही.अशा कुटुंबातील गॅस जोडणी असलेल्या महिला करिता हि Mukhyamantri Annapurna Yojana असणार आहे.

           मित्रांनो  त्याचप्रमाणे एक सिलिंडर संपून गेल्यानंतर दुसरे सिलेंडर मिळे पर्यंत,स्वयंपाक करण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे,वृक्षतोड करून पर्यावरणाला नुकसान होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे.आणि हीच बाब विचारात घेऊन महाराष्ट्र सरकाने वर्ष 2024-25 करिता अर्थसंकल्प सादर करतांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केलीली आहे.या योजने अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी,मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर (Refill) मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.राज्यात Mukhyamantri Annapurna Yojana प्रभावीपणे राबविण्यात यावी यासाठी शासन स्तरावरून वेळोवेळी शासन निर्णय काढण्यात येत आहे.

What are the Benefits of Mukhyamantri Annapurna Yojana ? अन्नपूर्णा योजनेचे फायदे व लाभार्त्याची पात्रता काय असेल ?

  • महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत असलेले 52 लाख 16 हजार गॅस जोडणी असलेले कुटुंब Mukhyamantri Annapurna Yojana 2024 साठी पात्र असतील.
  • तसेच नव्यानेच सुरु केलेली Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मध्ये पात्र झालेल्या महिला देखील अन्नपूर्णा योजने अंतर्गत  3 गॅस सिलेंडर (Refill) मोफत करिता पात्र असणार आहेत.
  • एका कुटुंबातील रेशन कार्डप्रमाणे फक्त एक लाभार्थी अन्नपूर्णा योजने करिता पात्र असणार आहे.
  • 14.2 कि.ग्रॅ.वजनाच्या गॅस सिलेंडर करिता लाभ मिळेल.Annapurna Scheme चा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावरती गॅस (Connection)जोडणी असणे आवश्यक आहे .

 

How to Apply For Annapurna Scheme ? अन्नपूर्णा योजने करिता अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या गॅस (Connection) जोडणी धारक यांना अन्नपूर्णा योजनेतून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे असणार आहे.

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या गॅस Connection धारकांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येत असते.आणि म्हणून राज्यशासनाच्या Mukhyamantri Annapurna योजनेच्या माध्यमातून देखील मोफत 3 गॅस सिलेंडर हे तेल कंपन्याच्या अंतर्गत देण्यात येईल.
  • आता सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी यांना गॅस सिलेंडर बाजारभावानुसार सरासरी 830 द्यावे लागतात.व त्या नंतर केंद्र शासन उज्ज्वला लाभार्थी यांना 300 ची सबसिडी त्यांच्या बँक खात्यात जमा करत असते.
  • अशाच पद्धतीने तेल कंपन्या राज्य सरकारकडून देणारी अंदाजे रक्कम रुपये 530 प्रती सिलेंडर या प्रमाणे ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करेल.या लाभार्थी यांच्या याद्या तेल कंपनी त्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील करतील.लाभार्थी यांची माहिती दर आठवड्याला तेल कंपन्या यांना शासनास उपलब्ध करून द्यावी लागेल.
  • Mukhyamantri Annpurna Yojana च्या माध्यमातून एका पात्र लाभार्थी यांना एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही.
  • जिल्हानिहाय गॅस सिलेंडरच्या किंमतीत तफावत असल्यास,तेल कंपन्याकडून वाटप करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किंमतीच्या आधारवर,प्रत्यक्ष खर्च होणारी रक्कम तेल कंपन्यांना देण्यात येईल.
  • तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा ,मुंबई व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी ,तसेच सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्याची जिल्ह्याप्रमाणे लाभार्थी यांना वितरीत केलेल्या  गॅस सिलेंडर तपशील यादी,देयक,वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई सादर करावी लागेल.

                   तर अशा प्रमाणे  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या लोकांना                                     Mukhyamantri Annapurna Yojana चा लाभ देण्यासाठी कार्यपद्धती जाहीर केलेली आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra

Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेच्या पात्र लाभार्थी यांना Annapura Yojana अंतर्गत 3 मोफत Gas Cylinder कसे दिले जाणार ?

  • मित्रांनो,राज्य सरकारच्या Mukhyamantri Annpurna योजनेच्या माध्यमातून 3 मोफत Gas सिलेंडर वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येणार आहे.
  • सदर योजनेकरिता ग्राहकास एका महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करण्यात येणार आहे.

               तर अशाप्रकारे मित्रांनो,शासनाच्या निर्णयाप्रमाणे 1 जुलै 2024 पर्यंत पात्र होणाऱ्या                            लाभार्त्यानाच Mukhyamantri Annapurna योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.दिनांक                     1 जुलै 2024 नंतर विभिक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेकरिता पात्र करण्यात येणार                                 नाही.अशाप्रकारे तुम्ही जर Annpuran योजनेसाठी पात्र होणार असेल ,तर तुमच्या                Gas कनेक्शनची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

             हि माहिती आवडल्यास ईतर मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद.

Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra
Picture of Saral Mahiti

Saral Mahiti

I am a Marathi YouTuber, website developer and owner/founder of Saral Mahiti website and YouTube channel. I am from Chhatrapati Sambhajinagar in Maharashtra.

Leave a Comment