नमस्कार शेतकरी मित्रांनो,Rabbi Pik Vima 2024 अर्ज प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे.रब्बी हंगाम 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या गहू,ज्वारी जिरायत,ज्वारी बागायत यांसारख्या रब्बी हंगामातील पिकांचा विमा शेतकरी काढू शकणार आहेत.Rabbi Pik Vima Last Date 2024 काय असेल. शेतकरी रब्बी हंगाम 2024 पिक विमा कशा पद्धतीने भरू शकणार आहेत,हे देखील जाणून घेणार आहोत.मित्रांनो शेतकरी यांच्या शेतातील शेतपिकांचे अतिवृष्टी,पूर,गारपीट ओला दुष्काळ यांसारख्या विविध नैसर्गिक आप्पती पासून नुकसान झाल्यास,ती नुकसान भरपाई त्या शेतकरी यांना मिळावी.याकरिता देशासह राज्यात प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY) राबविण्यात येत असते.खरीप हंगाम 2024 मध्ये लाखो शेतकरी यांनी पिक विमा काढला आहे.आणि आता नोव्हेंबर 2024 महिना सुरु झाला असून Rabbi Pik Vima 2024 ची नवीन अर्ज प्रक्रिया 9 नोहेंबर 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे.आणि आजच्या या महत्त्वपूर्ण पोस्टच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री फसल बिमा 2024 अंतर्गत रब्बी पिक विमा अर्ज,त्यासाठी लागणारे कागदपत्रे,ऑनलाईन अर्ज प्रक्रिया,पिक विमा मंजुरी प्रक्रिया,पिकाची नुकसान भरपाईची तक्रार अशाच सर्वच विषयाबाबत माहिती पाहणार आहोत.
Rabbi Pik Vima 2024 करिता शेतकरी यांनी अर्ज कसे करावे ?
शेतकरी मित्रांनो,Rabbi Pik Vima 2024 चे अर्ज भरण्यासाठी आपण CSC सेंटर,सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आपण Pik Vima Rabbi 2024 चे नवीन अर्ज भरू शकतात.शेतकरी यांना पिक विमा अर्ज भरण्याकरिता पुढीलप्रमाणे महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत.
शेतकरी यांनी पिक विमा अर्ज करत करतांनी विशेष काळजी घ्यावी.कागदपत्रावरील मराठी व इंग्रजी नावे योग्य आहेत का तपासावे.आधार कार्ड,बँक पासबुक ,पिक पेरा प्रमाणपत्र,सात बारा,नमुना आठ या सर्व कागदपपत्रा वरील नावे एकसारखी असावी.जेणेकरून पिक विमा कंपनीकडे विमा अर्ज सादर झाल्यानंतर विमा मंजुरी साठी अडचण येणार नाही.या बाबी देखील खूप महत्त्वाच्या असतात.हे देखील लक्षात असू द्या.
- आधार कार्ड
- डिजिटल सात बारा किंवा तलाठी प्रमाणित सात बारा
- डिजिटल 8अ किंवा तलाठी प्रमाणित 8अ
- बँक पासबुक
- पिक पेरा स्वयंघोषणापत्र
- सामाईक क्षेत्र असल्यास संमतीपत्र
वरील प्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी हंगाम 2024 करिता पिक विमा अर्जासाठी शेतकरी यांना कागदपत्रे लागणार आहेत.पिक विमा अर्ज भरल्या नंतर शेतकरी यांनी पिक विमा पावती आवश्यक घ्यावी.जेणेकरून पिक विमा मंजुरी करिता वेळोवेळी गरज पडेल.
PMFBY प्रधानमंत्री फसल बिमा योजना 2024 करिता मदत कुठे मिळेल ?
वेबसाईट : – https://pmfby.gov.in/
कृषी रक्षक पोर्टल मदत क्रमांक :- 14447
Crop Insurance मोबाईल App :- https://play.google.com/store/search?q=pmfby&c=apps&hl=en
Rabbi Pik Vima 2024 करिता Pik Pera 2024 Pdf व समंतीपत्र
शेतकरी पिक विमा भरतो,आणि Pik Vima मिळत नाही.काय असू शकतात कारणे ?
रब्बी पिक विमा 2024 भरण्याची अंतिम दिनांक काय असेल ?
शेतकरी मित्रांनो,प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2024 करिता आता मुदत वाढ मिळाली आहे.ज्यामध्ये गहू ,कांदा,हरभरा या पिकांचा पिक विमा अर्ज 15 डिसेंबर 2024 पर्यंत शेतकरी भरू शकणार आहेत.त्याचप्रमाणे ज्वारी जिरायत व ज्वारी बागायत या पिकाकरीता 30 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक होती.तसेच उन्हाळी भुईमूग आणि धान या पिकांचा पिक विमा भरण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यत अखेर दिनांक देण्यात आलेली आहे.
शेतकरी मित्रांनो,खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम फक्त पिक विमा फोर्म भरला म्हणजे पिक विमा मिळेल असे होत नाही.पिक विमा भरल्या नंतर ज्या पिकांचा विमा तुम्ही काढला आहे,त्या पिकांची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर घेणे गरजेचे आहे.म्हणजेच ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे.अतिवृष्टी किंवा कोणत्याही नैसर्गिक संकटामुळे शेतातील पिकांची नुकसान झाल्यास त्याची योग्यरित्या Crop Insurance App द्वारे संबधित पिक विमा कंपनीकडे 24 तासाच्या आत तक्रार करणे गरजेचे असते.किंवा तालुका स्तरीय पिक विमा लोक प्रतिनिधीकडे लेखी स्वरूपात तशी नुकसान भरपाई करिता माहिती देता येते.या सर्व गोष्टी योग्य असल्यास पिक विमा मिळवणे शेतकरी यांना सोयीचे होत असते.
अशा पद्धतीने शेतकरी यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पिक विमा फोर्म भरतांना काळजी घेतली पाहिजे..जेणेकरून विविध नैसर्गिक संकटापासून शेतपिकाचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळू शकेल.रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम प्रत्येक शेतकरी यांनी आपल्या शेतातील पिक विमा दरवर्षी आवर्जून भरला पाहिजे. हि माहिती उपयुक्त वाटत असल्यास ईतर शेतकरी बांधवांना देखील आवर्जून शेअर करावी.हि आपणास आग्रहाची विनंती.धन्यवाद