Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री फसल बिमा योजना
Pradhan Mantri Fasal Bima Yojana: केंद्र सरकार यांची प्रधानमंत्री फसल बिमा योजना काय आहे,शेतकरी यांना या योजनेचा कसा फायदा होतो.याबाबत सविस्तरपणे माहिती आज आपण पाहणार आहोत.प्रधानमंत्री फसल बिमा योजनेची सुरुवात माननीय भारत देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्ये सुरु करण्यात आली.या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा इतर कारणाने शेत-पिकाचे नुकसान झाल्यास त्या पिकाच्या नुकसान भरपाई शेतकरी यांना मिळावी हा आहे.या योजनेसाठी भारत देशातील प्रत्येक शेतकरी अर्ज करू शकतो.कृषी आणि कल्याण मंत्रालय यांची हि महत्त्वाकांक्षी योजना आहे.यासाठी शेतातील पिकाचा रीतसर विमा शेतकरी यांना काढावा लागतो.यामध्ये सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana या योजनेसाठी शेतकरी अर्ज कसा करू शकतात?
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Application process : प्रधान मंत्री फसल बिमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्विस सेंटर (सी.एस.सी) या ठिकाणी शेतकरी अर्ज करू शकतात.किंवा शेतकरी स्वतःदेखील अधिकृत वेबसाईट वरून अर्ज प्रक्रिया करू शकतात.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत पिक विमा मंजुरी प्रक्रिया कशा पद्धतीने करता येते?
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Application sanction : शेतकरी यांनी प्रधान मंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत आपल्या शेतातील पिकाचा विमा काढलेला असावा.शेतपिकाचे नुकसान झाल्यावर ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे त्याबाबतची रीतसर तक्रार शेतकरी यांना नोंदणी करावी लागते.तक्रार नोंदविल्यानंतर पिक विमा विमा कंपनी प्रतिनिधी स्वतःयेऊन संबंधीत शेतकरी यांच्या नुकसान झालेल्या पिकाची माहितीची सत्य पडताळणी करून त्या बाबतचा अहवाल पिक विमा कंपनीकडे पाठवतात.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री फसल विमा योजनेकरिता आवश्यक असलेले कागदपत्रे
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Application Documentation :
1. आधार कार्ड
2. बँक पासबुक
3. मोबाईल क्रमांक
4. सात बारा किंवा एकूण जमीन दाखला
5. सामाईक क्षेत्र असल्यास सहमती पत्र
6. पिक पेरा स्वघोषनापत्र
Pradhan Mantri Fasal Bima Yojana पिक विमा नुकसान तक्रार कशी करावी?
पिक विमा नुकसान तक्रार कशी करावी : शेतकरी यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या बाबतची तक्रार करण्यासाठी तुम्हाला मोबाईल प्ले स्टोअर वरून crop insurance हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.यामध्ये नोंदणी खात्याशिवाय काम सुरु ठेवा या ऑप्शनमध्ये जाऊन पिक विमा नुकसान पर्यायामध्ये पिक विमा नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करावे.या ठिकाणी मोबाईल OTP व्हेरीफीकेशन प्रक्रिया पूर्ण करावी.या नंतर हंगाम,वर्ष,योजना,राज्य यांनी निवड करावी.यानंतर नोंदणीचा स्त्रोत निवड करावी.तुमच्याकडे अर्ज / पॉलिसी क्रमांक आहे का ? या ऑप्शनला निवड करून पॉलिसी क्रमांक टाकावा.यानंतर ज्या ज्या पिकांचा विमा आपण काढला आहे त्या पिकांची यादी गट क्रमाकसहित या ठिकाणी दिसेल.या मध्ये विचारलेली माहिती भरून आपण पिकांची तक्रार नोंदणी करू शकता.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana शेत पिकांचे नुकसान कोणकोणत्या कारणाने होऊ शकते?
या पोस्टच्या माध्यमातून प्रधान मंत्री फसल बिमा योजनेबाबत संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे.
आपल्याला माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा धन्यवाद.