Pm Sanman Nidhi Yojana

Pm Sanman Nidhi Yojana Mahiti प्रधानमंत्री सन्मान निधी योजना माहिती

Facebook
WhatsApp
Telegram

Pm Sanman Nidhi Yojana Mahiti
प्रधानमंत्री सन्मान निधी योजना माहिती

               शेतकरी मित्रांनो आज आपण Saral Mahiti  या आपल्या वेब पोर्टलवर केंद्र सरकार यांची Pm Sanman Nidhi Yojana योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेतकरी यांना वार्षिक सहा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. चार चार महिन्याच्या अंतराने 2 हजार रुपये हप्ता अशा स्वरूपात अनुदाची रक्कम लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात १ डिसेंबर २०१८ मध्ये केली होती.तसेच या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकरी यांना एकूण १४ हप्त्ते वितरीत करण्यात आलेले आहेत.१४ व्वा हप्ता हा जुलै २०२३ मध्ये शेतकरी यांना देण्यात वितरीत करण्यात आला होता.या योजनेबाबत सविस्तर माहिती पाहूया. 

Pm Sanman Nidhi योजनेकरिता अर्ज व नोंदणी प्रक्रिया कशा पद्धतीने असते ?

              शेतकरी मित्रांनो Pm Sanman Nidhi Yojana अर्ज प्रक्रीया संपूर्णपणे  ऑनलाईन स्वरुपाची आहे.जर आपण स्वतः इंटरनेट वापराबद्द्ल जाणत असाल,तर तुम्ही या https://pmkisan.gov.in/ च्या  अधिकृत वेबसाईट वरून नवीन नोंदणी करिता अर्ज करू शकता.किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र,सी.एस.सी.सेंटर,सेतू सुविधा केंद्र अथवा इंटरनेट कॅफे वरून देखील प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.अर्ज केल्यानंतर त्याचा ऑनलाईन अर्ज क्रमांक हा शेतकरी यांना मिळत असतो.अर्जाबाबतचा तपशील पाहण्यासाठी आपण कृषी सहाय्यक ,तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क करू शकता.शेतकरी यांना आपल्या अर्जाबाबतची अधिकृत माहिती या ठिकाणी उपलब्ध होते.

Pm Sanman Nidhi
Pm Kisan

Pm Sanman Nidhi योजनेच्या नोंदणी करिता लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे कोणकोणती असतात ?

  • शेतकरी यांचे मोबाईल नंबर लिंक असलेले स्वतःचे आधार कार्ड
  • शेतजमिनीचा सात बारा उतारा डिजिटल स्वरूपाचा किंवा तलाठी यांनी प्रमाणित     केलेला
  • फेरफार नंबर
  • ऑनलाईन असलेले रेशन कार्ड व त्याचा नंबर
  • राष्ट्रीयकृत बँकचे बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक
           या प्रमाणे Pm Sanman Nidhi Yojana करिता कागदपत्रे लागत असतात.शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी आधार कार्ड अद्यावत असायला हवे म्हणचेच आधार कार्ड हे बायोमेट्रिक अपडेट असले पाहिजे व त्याला चालू मोबाईल नंबर देखील लिंक असावा.खूप जुने आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अडचण येऊ शकते.त्यामुळे शेतकरी यांनी आपले आधार कार्ड जर कधीच अपडेट केले नसेल तर अद्यावत  म्हणचेच बायोमेट्रिक अपडेट करावे.जेणेकरून तुम्हाला प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी कधीही अडचण निर्माण होणार नाही.

Pm Sanman Nidhi योजने करिता कोण-कोण अपात्र असेल ?

       शेतकरी मित्रांनो केंद्र सरकाने Pm Sanman Nidhi योजने करिता अनेक अपात्रतेच्या अटी व नियम लागू केले आहेत.या निकष व अटीमध्ये आपण येत असाल.आणि प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल,तर कायद्याने आपण शासनाची फसवणूक करत आहोत असे समजा.शासनाच्या असे निर्दशनास आल्यास अनुदाची रक्कम वापस करण्याबाबत नोटीस मिळू शकते.त्यामुळे या निकष व अटी कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया.

 

Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana

       प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या अपात्रतेचे निकष व अटी खालीलप्रमाणे आहेत :-

  •  सर्व संस्थात्मक जमीनधारक  
  • अशी शेतकरी कुटुंबे जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी निगडीत आहेत.
  • संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी व माजी व्यक्ती.
  • आजी/माजी/मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार / राज्यसभा सदस्य, आजी/ माजी विधानसभा ,विधान परिषद सदस्य,आजी/माजी महानगर पालिकेचे महापौर,आजी/माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी,शासन अंगीकृत निमशासकीय संस्थाच्या अखत्यारीतील कार्यालयामधील आणि स्वायत्त संस्थाचे सर्व अधिकारी / कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थामधील नियमित अधिकारी / कर्मचारी.
  • चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून.
  • मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
  • नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर ,वकील ,अभियंता,सनदी लेखापाल (C.A) वास्तुशास्त्र इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती
  • याप्रमाणे केंद्र सरकार यांनी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या अपात्रतेच्या अटी व नियम लागू केलेले आहेत.

 

Pm Sanman Nidhi योजनचे एकूण हप्प्ते शेतकरी यांना किती मिळाले हे कसे पहाल ?

           Pm Sanman Nidhi योजनेचे आतापर्यत पात्र झालेले लाभार्थी शेतकरी यांना एकूण १४ हप्प्ते केंद्र सरकार यांच्याकडून वितरण करण्यात आले आहे.म्हणचेच आतापर्यंत या योजनेतून २८ हजार रुपये शेतकरी यांना मिळाले आहेत.व लवकरच १५ व्वा हप्ता हा नोव्हेंबर २०२३ किंवा डिसेंबर २०२३ मध्ये वितरीत होण्याची शक्यता आहे.यामध्ये शेतकरी यांना आजवर मिळालेल्या हप्त्याचा तपशील (स्टेट्स ) पहायचा असल्यास  पी.एम.किसान च्या https://pmkisan.gov.in/   अधिकृत वेबसाईट वर यावे लागेल.या ठिकाणी आल्यानंतर  KNOW YOUR STATUS हा पर्याय वापरून प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या अनुदान बाबतचा सर्व तपशील शेतकरी यांना पाहता येतो.यासाठी शेतकरी यांना प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर ) माहित असायला हवा.या नोंदणी क्रमांकाच्या आधारे प्रधानमंत्री सन्मान निधी योजने बाबत लाभार्थी शेतकरी यांना अनुदांनाच्या रक्कमेबाबत संपूर्ण विवरण पाहता येईल. 

Pm Kisan Yojana

Pm Sanman Nidhi प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) शेतकरी यांना कसा मिळवता येईल ?

         Pm Sanman Nidhi योजना हि शेतकरी यांना कायमस्वरूपी अर्थसहाय्य देणारी अशी योजना आहे.आणि म्हणूनच केंद्र सरकार यांनी या योजनेमधील पात्र लाभार्थी शेतकरी यांचा एक नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) तयार केला आहे.जो कि प्रत्येक शेतकरी यांचा वेगवेगळा आहे.हा नोंदणी क्रमांक प्रत्येक शेतकरी यांना माहित असणे गरजेचे आहे.नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या या https://pmkisan.gov.in/ वेबसाईट वर यावे लागेल. KNOW YOUR STATUS या पर्यायामध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी योजनासाठी दिलेला मोबाईल क्रमांक टाकून नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) मिळविता येतो.तसेच दुसरा पर्याय म्हणचे आधार नंबर टाकून देखील नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) शेतकरी यांना मिळविता येईल,परंतु यासाठी शेतकरी यांच्या आधार कार्डला चालू मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते.या ठिकाणी  ओटीपी व्हेरीफीकेशन प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) अगदी सहज मिळवू शकतात.हा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर)  खूप महत्त्वाचा असल्याकारणाने  तो लक्षात ठेवा किंवा आपल्याकडे लिहून ठेवा,जेणेकरून नेहमी शेतकरी यांना प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेबाबत तपशील पाहता येईल.

मदत क्रमांक :- 155261 / 011- 24300606
अधिकृत वेबसाईट  : https://pmkisan.gov.in/

प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे ऍप डाऊनलोड करा :-https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan

या पी.एम.किसान.मोबाईल ऍप चा उपयोग करून देखील प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेबाबत अधिक माहिती आपण पाहू शकता.

          तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार यांची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री सन्मान निधी योजना बाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली.आपल्याला हि पोस्ट आवडल्यास ईतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा.धन्यवाद

Picture of Saral Mahiti

Saral Mahiti

I am a Marathi YouTuber, website developer and owner/founder of Saral Mahiti website and YouTube channel. I am from Chhatrapati Sambhajinagar in Maharashtra.

Leave a Comment