Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana : मित्रांनो,आज आपण महाराष्ट्र राज्य सरकार यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे.या योजनेचा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांना कशा स्वरूपाने फायदा होईल.याबाबत माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.केंद्र सरकार यांची प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने २०२३ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे.सन २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कशा पद्धतीने राबविण्यात येईल याबाबत सांगण्यात आले होते कि, अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार यांच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकरी यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतात.या अनुदानामध्ये अधिकची भर पडावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येईल अशी तरतूद केली आहे.याबाबत राज्य सरकार यांनी तसा शासन निर्णय देखील काढला आहे.
१५-०६-२०२३ रोजीच्या अधिकृत शासन निर्णयाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यांच्या अनुदान वितरीत करण्यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलला स्वतंत्र आज्ञावली विकसित केली जाणार आहे.याबाबत शासन निर्णयामध्ये माहिती देण्यात आली होती.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Aplication process: शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज व नोंदणी प्रक्रिया करण्याची गरज नाही.जे शेतकरी केंद्र सरकार यांच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत,ते सर्व शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभ घेऊ शकतात.राज्य सरकार यांनी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असलेले सर्वच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र केले आहेत.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज व नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली नाही.याचे महत्वाचे कारण म्हणचे केंद्र सरकार यांनी सुरु केलेली प्रधानमंत्री सन्मान निधी योजना.राज्य सरकारनी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनाचा लाभ घेत असलेले सर्वच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता ग्राह्य धरले आहेत.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana First Installment नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रथम हप्ता कधी वितरीत केला जाणार ?
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana First Installment: शेतकरी मित्रांनो,नमो शेतकरी योजनेचा प्रथम हप्ता हा एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ या महिन्याकरिता असणार आहे.नमो शेतकरी योजनेचा प्रथम हप्ता हा २६ ऑक्टोबर २०२३,वार गुरवार या दिवशी वितरण करण्यात आला आहे.देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील एका कार्यक्रमचे अवचित साधून नमो शेतकरी योजनेचा प्रथम हप्ता हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana eligible ineligible नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे ?
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana eligible ineligible:शेतकरी मित्रांनो,नमो शेतकरी योजनेसाठी नवीन अर्ज व कोणत्याही प्रकारे नोंदणी करण्यात आली नाही.त्यामुळे अनेक शेतकरी यांना नमो शेतकरी योजनेसाठी पात्र अपात्र आहोत कि नाही,याबाबत प्रश्न आहे.आपल्या माहितीकरिता सांगण्यात येते कि,केंद्र सरकार यांची प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेची जे लाभार्थी शेतकरी आहेत,ज्यांना आतापर्यंत एकूण १४ हप्प्ते मिळाले आहेत.असे सर्व शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रथम हप्त्यासाठी पात्र करण्यात आले आहेत.व त्यांना प्रथम हप्ता वितरीत देखील झाला आहे.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana How beneficial नमो शेतकरी योजनेची किती लाभार्थी आहेत ?
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana How beneficial: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांच्यासाठी सुरु करण्यात आलेली, राज्य सरकार यांची नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी ८६ लाखापेक्षा जास्त असणार आहेत. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी बरेच शेतकरी अजून देखील के.वाय.सी.,बँक आधार सीडिंग अशा एक नाही तर अनेक कारणामुळे पात्र झालेले नाहीत.त्यामुळे नमो शेतकरी योजनेची लाभार्थी शेतकरी संख्या अजून देखील वाढू शकते.
मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार यांची २०२३ मध्ये सुरु करण्यात आलेली नवीन योजना नमो शेतकरी महासन्मान निधी काय आहे.याबात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.आशा करतो कि आपल्याला हि पोस्ट नक्कीच आवडील असेल.ईतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा.धन्यवाद