Bandhkam Kamgar यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अनेक योजना
कामगार यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर Bandhkam Kamgar कल्याणकारी मंडळ यांच्या अनेक योजना
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे खास करून कामगार यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय चांगल्या स्वरूपाच्या योजना आणत असते .पण यासाठी सर्वात प्रथम तुम्ही कामगार म्हणून मंडळ यांच्याकडे नोंदणी केलेली असायला हवी .चला तर माहिती करून घेऊया कामगार यांच्यासाठी हे कामगार मंडळ कोण-कोणत्या योजना देत असते याबाबत सविस्तर माहिती करून घेऊ.
प्रथम विवाह झाल्यानंतर पहिल्या बाळतपणासाठी 30 हजार रुपये हे कामगार मंडळ देतो
सर्वात प्रथम कल्याणकारी योजनामध्ये कामगार यांना प्रथम विवाह झाल्यानंतर पहिल्या बाळतपणासाठी 30 हजार रुपये हे Bandhkam Kamgar मंडळ देतो .यासाठी कामगार यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते व प्रथम विवाह शपथपत्र देखील कामगार यांच्याकडे असायला पाहिजे.
मार्फत 5 हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगार यांना लागणारे विविध अवजारे खरेदीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत 5 हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते .यासाठी कामगार यांच्याकडे अवजार खरेदी करणार असल्याचे कामगाराचे हमीपत्र असायला पाहिजे.
Bandhkam Kamgar यांना अपघात विमा
तसेच कामगार यांना अपघात विमा देखील मिळत असतो प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा कवच हे कामगार यांना मिळते .यासाठी त्याचे राष्ट्रीयकृत बँक शाखेमध्ये स्वतःचे बँक खाते असायला हवे.
शैक्षणिक योजना
कामगार यांच्या मुलांना शैक्षणिक योजना अंतर्गत 1 ली ते 7 वी प्रती वर्ष रुपये 2500 शिष्यवृत्ती चा लाभ मिळत असतो.8 वी ते 7 वी पर्यत च्या विद्यार्थी यांच्यासाठी रुपये 5000 लाभ घेता येतो .परंतु यासाठी कामगार यांच्या मुलांची शाळेमध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उपस्थिती आवश्यक असते .तसेच इयत्ता 10 वी ते 12 वी करिता प्रती वर्ष 10 हजार रुपयाचा लाभ मिळतो .याकरिता 50 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क असायला पाहिजे.
त्याचप्रमाणे पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रती वर्ष 20 हजार रुपयाचा लाभ मिळत असतो
कामगार यांच्या पत्नीला देखील हा लाभ मिळवता येतो .वैद्यकीय क्षेत्रातील पदवी करिता प्रती वर्ष 1 लाख रुपये मिळतात .तसेच अभियांत्रिकी पदवी करिता प्रती वर्ष 60 हजार रुपयाचा लाभ मिळवता येतो .यासाठी मागील शिक्षणाचे गुणपत्रक आवश्यक असते.व चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतचे बोनाफाईड किंवा प्रवेश पावती आवश्यक असते.
नोंदणीकृत बांधकामगार यांच्या दोन पाल्यासाठी ms-cit चा संगणक कोर्ससाठी कामगार मंडळ कोर्सची फीस देते .यासाठी ms-cit उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व फीस भरल्याची पावती असायला हवी.
आरोग्य विषयक योजना
कामगार यांच्या आरोग्याची काळजी देखील बांधकामगार मंडळ घेत असते .यासाठी नैसर्गिक प्रसूतीसाठी 15 हजार रुपये मिळतात .आणि जर शस्त्रक्रियाद्वारे प्रसूती झाली तर 20 हजार रुपये मिळतात .दोन जीवित अपत्यसाठी देखील याचा लाभ मिळतोच .तसेच गंभीर आजाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी 1 लाख रुपयेचे चे आर्थिक सहाय्य मिळते .यामध्ये कामगार लाभार्थी यांच्या कुटुंबीयांचा समावेश असेल.