Ayushsman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana आयुष्यमान भारत योजना माहिती

Facebook
WhatsApp
Telegram

Ayushman Bharat Yojana आयुष्यमान भारत योजना माहिती

Ayushman Bharat Yojana : मित्रांनो,भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना काय आहे ? या योजनेचा काय फायदा मिळतो.या पोस्टमध्ये आपण या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.आयुष्यमान भारत योजना तुमच्या आरोग्याच्या दृष्टीकोणाच्या हेतूने खूप महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे.कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती करिता आयुष्यान भारत योजना महत्वाची ठरणार आहे.देशातील प्रत्येक मध्यम व गरीब प्रवर्गातील व्यक्तीला चांगली आरोग्याची सेवा उपलब्ध व्हावी. या उद्देशाने जन आरोग्य अभियान योजनेची म्हणचेच आयुष्मान भारत योजनेची सुरुवात भारत सरकारकडून करण्यात आली आहे.या योजनेकरिता सुरवातीला ग्रामणी व शहरी भागातील नागरिकांचे सर्वक्षण करून लाभार्थी यांच्या याद्या प्रसिद्ध केलेल्या होत्या.आपकेद्वार आयुष्यान या वेबसाईटला ग्रामणी व शहरी अशा दोन्ही प्रकारच्या लाभार्थी यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या होत्या.परंतु या ठिकाणी बऱ्याच नागरिकांचे नावे याद्यांमध्ये समाविष्ट नव्हते.त्यामुळे खूप सारे नागरिक आयुष्मान भारत योजनेपासून वंचित होते.

      परंतु आता या योजनेकरिता नव्याने नोंदणी प्रक्रिया होत आहे.आपण या योजनेसाठी अर्ज कसा करावा.व आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड कसे बनवावे.याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल.

Ayushaman Bharat

Ayushman Bharat Yojana Registration आयुष्यमान भारत योजना नोंदणी प्रक्रिया कशी आहे ?

  Ayushman Bharat Yojana Registration : ग्रामीण भागामध्ये आयुष्मान भारत योजनेचे कार्ड बनविण्यासाठी आशा सेविका यांच्याकडे आपण मदत घेऊ शकता.तसेच CSC सेंटरवर देखील आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनविता येते.शहरी भागातील नागरिक सबंधित आरोग्य विभागाशी संपर्क करू शकतात. व आरोग्य मित्रांची देखील मदत घेऊ शकता.

Ayushaman Bharat

Ayushman Bharat आयुष्यमान भारत योजेमध्ये कोणकोणत्या आजारावर उपचार केले जातात ?

  Ayushman Bharat Yojana : मित्रांनो या योजनेमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे आजार समाविष्ट आहेत.कर्करोग,बालरोग,गंभीर स्वरूपाच्या शस्रक्रिया या सारखे मोठ्या आजारावर उपचार केले जातात.पाच लाख रुपये पर्यंत या योजनेमध्ये समाविष्ट आजारावर उपचार मोफत केले जातात.समाविष्ट रोग व आजाराबाबत अधिक माहितीसाठी आपण आरोग्य मित्रांची मदत घ्या.
         अधिकृत वेबसाईटला भेट द्या.आयुष्यमान भारत योजनेबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही खालील मदत क्रमांकवर संपर्क करू शकतात.

4477
1800-11-4477
https://abdm.gov.in/

Ayushsman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनविण्यासाठी काय काय पात्रता आहे ?

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड सध्या तरी ज्या व्यक्तीकडे ऑनलाईन झालेले रेशन कार्ड नंबर व आधार कार्ड आहेत असे नागरिक आयुष्यमान भारत कार्डसाठी के.वाय.सी.प्रक्रिया पूर्ण करू शकतात.के.वाय.सी.प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण CSC केंद्रावर व आशा सेविका यांची मदत घेऊ शकता.या ठिकाणी के.वाय.सी.प्रक्रिया पूर्ण करू शकता

Ayushsman Bharat Yojana
Ayushman Bharat Yojana Scheme मी आयुष्यमान भारत योजनेकरिता पात्र आहे किंवा नाही कसे पहावे ?

Ayushman Bharat Scheme : आपण आयुष्यमान भारत योजनेकरिता पात्र आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://beneficiary.nha.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. 
Beneficiary या ऑप्शन मध्ये लॉगीन करावे.या ठिकाणी मोबाईल नंबर आधार नंबर टाकून  योजनेमध्ये नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे कळेल.यामध्ये तुम्ही तुमची के.वाय.सी.प्रक्रिया देखील पूर्ण करू शकता.
   तसेच ayushna bhart mobile app प्ले स्टोर वरून डाऊनलोड करावे.या मध्ये देखील तुम्ही पात्र आहे किंवा नाही हे तुम्हाला कळू शकेल.Am I Eligibel? मध्ये Beneficiary ऑप्शन घेऊन मोबाईल नंबर टाकून आयुष्यमान भारत योजनेकरिता पात्र आहे किंवा हे देखील कळते.

Ayushsman Bharat Yojana
Ayushman Bharat Yojana Mahiti आपण स्वतः कशा पद्धतीने के.वाय.सी.प्रक्रिया पूर्ण करू शकतो ?

Ayushman Bharat Yojana : यासाठी तुम्हाला स्मार्ट फोनमध्ये प्ले स्टोअर वरून Ayushman App घ्यावे लागेल.यामध्ये बेनीफिशरी पर्याय वापरून के.वाय.सी.
ची प्रक्रिया पूर्ण करता येते.आधार नंबर व मोबाईल नंबर टाकून आपल्याला आपण या योजनेसाठी पात्र आहोत किंवा नाही हे देखील कळते. ही सर्व ॲप मधील  प्रक्रिया करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
       आयुष्यमान ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा:https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp&hl=en_US

Ayushsman Bharat Yojana
Ayushman Bharat Yojana आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड किती दिवसात मिळते ?

Ayushman Bharat Yojana : मित्रांनो,एकदा कि आपण आयुष्यमान भारत योजनेची के.वाय.सी.प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्यानंतर त्याचा स्टेट्स चेक करावा लागेल.कधी कधी के.वाय.सी.प्रक्रिया केल्यानंतर कार्ड लगेच अप्रोवल होते.तर कधी कधी अप्रोवल होण्यासाठी वेळ देखील लागतो.आयुष्यमान भारत अँपच्या मदतीने कार्ड डाऊनलोड करता येते.आयुष्यमान ॲपमध्ये तुमच्या कार्डचा स्टेट्स करता येतो. स्टेट्समध्ये अप्रोवल असल्यास आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकतात.
   मित्रांनो आयुष्यमान भारत हि योजना तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीकोनाणे अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे.या बाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा.धन्यवाद मित्रांनो……… 

Ayushsman Bharat Yojana
Picture of Saral Mahiti

Saral Mahiti

I am a Marathi YouTuber, website developer and owner/founder of Saral Mahiti website and YouTube channel. I am from Chhatrapati Sambhajinagar in Maharashtra.

Leave a Comment