नमस्कार मित्रांनो,Ladki Bahin Yojana Maharashtra राज्यात सध्या अतिशय जलद गतीने राबविण्यात येत आहे.महिलांनासाठी महत्त्वपूर्ण अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो,Ladki Bahin योजनेची राज्यात अंमलबजावणी व व्यापकप्रमाणत हि योजना राबविली जावी याकरिता,वेळोवेळी महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेचा मुख्य उद्देश जर आपण बगितला तर,राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व तिचे आरोग्य,पोषण करण्यासाठी तसेच कुटुंबातील जबाबदार व्यक्ती म्हणून एका महिलेची निर्णायक भूमिका मजबूत व्हावी हा योजनेचा हेतू आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार लाभार्थी महिलेचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष असणे गरजेचे आहे.विधवा,अविवाहित,परितक्त्या,निराधार व घटस्फोटीत महिला Ladki Bahin Yojana साठी Official Website किंवा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत मोबाईल App च्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतात.Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana करिता ज्या ज्या महिला पात्र होईल त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन मिळणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 2024 करिता Online अर्ज (apply) करण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
- बँक पासबुक
- हमीपत्र
- पासपोर्ट फोटो
- डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शालेय टी .सी
- रेशन कार्ड किंवा तहसील उत्पन्न प्रमाणपत्र
या प्रमाणे अर्जदार महिलांना Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana करिता कागदपत्रे लागणार आहे.ऑनलाईन अर्ज सादर करतांना वरीलप्रमाणे कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन जोडावी लागतात.त्यामुळे अर्जदार महिला लाभार्थी यांना हि कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत..

Ladki Bahin Yojana करिता Maharashtra राज्यातील महिलांनी अर्ज कुठे व कसा करावा ?
मित्रांनो Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana साठी अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकार यांनी सुरु केलेली अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल App चा उपयोग करता येतो.ऑनलाईन वेबसाईट किंवा मोबाईल App वर लाभार्थी महिलेला एकदा स्वतःचे प्रोफाईल तयार करून सर्वसाधारण विचारलेली माहिती भरावी लागेल.त्या नंतर Mazi Ladki bahin Yojana साठी सांगितलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून जोडावी लागेल.अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्यास त्या सबंधित मेसेज नोंदणीकृत मोबाईल वर देण्यात येतो.जुलै 2024 मध्ये सुरु झालेली अर्ज प्रक्रिया ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत चालणार आहे .तसेच अजून Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana करिता अर्ज करण्यासाठी वाढीव वेळ सरकार देईल का ? हे देखील पहाणे महत्त्वाचे असणार आहे.ग्रामपंचायत,नगर पालिका,तहसील या ठिकाणी देखील अर्ज Offline किंवा Online दाखल करता येईल.

Ladki Bahin योजनेचा अर्ज नामंजूर होण्याची काय काय कारणे असू शकतात ?
- आधार कार्ड व अर्ज सादर करत असतांना नोंदणी केलेल्या नावात तफावत असणे.
- अर्जदार महिला वर वर्ष 21 ते 65 वर्ष वयोगटातील नसल्यास .
- अर्दाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे नसल्यास .
- वयाचा योग्य पुरावा जोडला नसल्यास.
- योग्य ओळखपत्र जोडले नसल्यास.
- आधार क्रमांक चुकीचा असल्यास.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर असल्यास.
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड जोडले नसल्यास.
- बँक तपशील योग्य नसल्यास.
- चार चाकी वाहन (ट्रक्टर वगळून) कुटुंबातील सदस्याच्या नावे असल्यास.
- कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास.
- कुटुंबातील सदस्य विध्यमान किंवा माजी खासदार/आमदार असल्यास.
- कुटुंबातील व्यक्ती निवृत्ती वेतन घेत असल्यास.
- कुटुंबातील व्यक्ती कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपअध्यक्ष /संचालक सदस्य असल्यास.
- कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतला असल्यास.
- इतर कारणे देखील असू शकतात
वरील कारणामुळे Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana चा अर्ज Partial Recect किंवा Fully Rejcet केला जाऊ शकतो.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana साठी अधिकृत वेबसाईट वरून अर्ज कसा कराल ?
मित्रांनो,Mazi Ladi Bahin Yojana 2024 करता सरकारने सुरु केलेल्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून अर्ज दाखल करता येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असणार आहे.माझी लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन वेबसाईट गेल्यानंतर अर्जदार लॉगीन हा पर्याय वापरून Creation Account Option मधून एकदा स्वतः प्रोफाईल तयार करेल.त्यानंतर प्रोफाईल मध्ये तयार केलेला लॉगीन आय डी व पासवर्ड वापरून Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजना करिता विचारलेली माहिती भरून अर्ज सादर करावा .अर्जातील विचारलेली माहिती भरल्यानंतर पुढीलप्रमाणे विचारलेली कागदपत्रे ऑनलाईन स्कॅन करून जोडावी लागेल.ज्यामध्ये महिलेचे आधार कार्ड,बँक पासुबुक ,रेशन कार्ड किंवा तहसील उत्पन्न ,योजनेचे हमीपत्र,डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शालेय टी.सी.लागणार आहे.तसेच अर्जदार महिलेचा पासपोर्ट फोटो किंवा लाईव्ह फोटो देखील जोडावा लागेल.अशा प्रकारे आपण Mazi Ladi Bahin Yojana 2024 करता https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून अर्ज दाखल करू शकतात.या योजनेचा प्रथम हप्ता 16 ऑगस्ट 2024 नंतर मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana करिता मोबाईल App च्या मदतीने कसा कर्ज दाखल करावा ?
मित्रांनो,माझी लाडकी बहिण योजने करिता महाराष्ट्र सरकारने नारी शक्ती हे ( Narishakti Doot ) मोबाईल App सुरु केलेले आहे.नारी शक्ती हे App प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे.Narishakti Doot App मोबाईलमध्ये इंस्टाल केल्या नंतर अर्जदार महिलेला एकदा स्वतःचे प्रोफाईल तयार करावे लागणार आहे.प्रोफाईल तयार केल्या नंतर Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 साठी अर्ज दाखल करता येईल.अर्ज सादर करतांनी सर्वसाधारण माहिती भरावी लागेल.ज्यामध्ये महिलेचे नाव,बँक खाते तपशील,जन्म दिनांक याप्रमाणे माहिती विचारली जाते.अतिंम टप्यामध्ये वरीलप्रमाणे योजनेकरिता मागवत असलेले कागदपत्रे स्कॅन करून जोडावी लागतात.अशा प्रकारे Narishakti Doot Mobile App मधून अर्ज सादर करता येईल.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana करता लागणारे मोबाईल App डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा :-
हमीपत्र |
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मोबाईल Application,मदत क्रमांक आणि अधिकृत वेबसाईट आपण इथ पाहू शकता :-
वेबसाईट –https://ladakibahin.maharashtra.gov.in/
मदत क्रमांक-181
App-https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&pca mpaignid=web_share
मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य सरकारने खास करून राज्यातील महिलाकरिता Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojan सुरु केलेली आहे.तुम्हाला हि पोस्ट आवडल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद