Kharip Pik Vima Arj 2024 माहिती
नमस्कार शेतकरी मित्रांनो,Kharip Pik Vima Arj 2024 च्या संधर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.आपण बगितल असेल,वर्ष 2023 खरीप हंगाम मधील प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी यांना पिक विमा वाटप करण्यात आला आहे.आणि आता Pik Vima Arj 2024 Registration कधी सुरु होईल ? शेतकरी यांना कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्रे लागतील ? पिक विमा अर्ज Form भरतांना शेतकरी यांनी काय काय काळजी घ्यावी ? याबाबत सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
खरीप हंगाम 2024 Pik Vima Arj Registration साठी शेतकरी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पिक पेरा स्वयंघोषणापत्र
- सात बारा
- सामाईक क्षेत्र असल्यास संमतीपत्र
या प्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप हंगाम 2024 मध्ये पिक विमा अर्ज करण्यासाठी शेतकरी यांना हि महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.पिक पेरा प्रमाणपत्र व सामाईक क्षेत्र असल्यास संमतीपत्र शेतकरी इथून डाउनलोड करू शकता.16 जून 2024 पासून खरीप हंगाम 2024 पिक विमा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आले आहेत.तेव्हा शेतकरी यांनी पिक विमा अर्ज भरून घ्यावा.
Pik Vima Arj शेतकरी कुठे करू शकता ?
प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता पिक विमा अर्ज प्रक्रिया कधी पासून सुरु होणार ?
शेतकरी मित्रांनो,राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या पाउस सुरु झाला असून,जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक जिल्ह्यात कापूस,मक्का,तूर,सोयाबीन यांसारख्या खरीप हंगामातील पिकांच्या लागवडी सुरु झाल्या आहेत.आणि आता यासाठी पिक विमा अर्ज जून महिन्याच्या अखेर किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.
पिक विमा भरला परंतु पिक विमा मिळत नाही,काय आहेत कारणे जाणून घ्या ?
शेतकरी मित्रांनो,फक्त पिक विमा फोर्म भरला म्हणचे तुम्हाला पिक विमा मंजूर होईल,असं कधीही होत नसते.पिक विमा अर्ज करतांनी शेतकरी आपल्या शेतातील ज्या ज्या पिकांच्या लागवडी पिक पेरा स्वयंघोषणापत्रमध्ये दाखवत असेल.त्या त्या पिकांच्या पेरा सातबाऱ्यावर घेणे गरजेचे असते.म्हणचेच पिक विमा फोर्म भरल्यानंतर मोबाईल अॅपच्या माध्यमातून ई-पिक पाहणी करणे गरजेचे असते.त्याच बरोबर शेतातील ज्या ज्या पिकांचा पिक विमा भरला आहे.अशा पिकांची पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी याकरिता रीतशीर तक्रार करावी लागत असते.अशा पद्धतीने शेतकरी आपला पिक विमा मिळविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करू शकता.
पिक विमा मंजुरी प्रक्रिया :-
- प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पिक विमा अर्ज करणे
- ई-पिक पाहणी करणे
- शेत पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडे मोबाईल अॅपद्वारे तक्रार नोंदविणे.
- पिकाची तक्रार पाहणी करण्यासाठी पीकविमा कंपनी प्रतिनधी यांची प्रत्यक्ष पाहणी भेट व पंचनामा प्रक्रिया.
- पिक तक्रार मंजूर झाल्यास शेतकरी यांच्या बँक खात्यात क्लेमचा पिक विमा कंपनीद्वारे जमा होणे.
· पिक विमा मंजुरी,नुकसान भरपाई तक्रार याविषयी अधिक माहिती शेतकरी तालुकास्तरीय पिक विमा प्रतिनिधी यांच्याकडे जाणून घेऊ शकता
पिक विमा मदत क्रमांक व वेबसाईट
मदत क्रमांक 14447
प्रधानमंत्री फसल विमा App
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central&pcampaignid=web_share
अशा पद्धतीने शेतकरी यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पिक विमा फोर्म भरतांना काळजी घ्यावी.जेणेकरून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल.हि उपयुक माहिती ईतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा.धन्यवाद.